- ‘घरगुती गणपती सजावट स्पर्धे’च्या माधमातून करा बक्षिसांची लयलूट..
- मा. नगरसेवक चंद्रकांत नखाते आणि शुभम नखाते युथ फाऊंडेशनचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ सप्टेंबर २०२४) :- गणेशोत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड शहर भाजपचे जेष्ठ नेते तथा मा. नगरसेवक चंद्रकांत नखाते आणि शुभम चंद्रकांत नखाते युथ फाऊंडेशनच्या वतीने चिंचवड मतदार संघातील गणेश भक्तांसाठी ”पिंपरी चिंचवड गौरवशाली गणेशमहोत्सव २०२४” चे आयोजन करण्यात आले आहे.
‘घरगुती गणपती सजावट स्पर्धे’च्या माधमातून गणेश भक्तांना बक्षिसांची लयलूट करता येणार आहे. यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी आवश्यक आहे. क्युआर कोडद्वारे नोंदणी करता येईल. प्रत्येक स्पर्धकास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
दरम्यान प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सात विजेत्यांना इलेक्ट्रिक बाईक, दुसऱ्या क्रमांकावरील ११ विजेत्यांना एलईडी टीव्ही, तर तृतीय क्रमांकावरील तब्बल २२ विजेत्यांना अॅक्वा गार्ड, चतुर्थ क्रमांकावरील ५१ विजेत्यांना मिक्सर, पाचव्या क्रमांकाच्या १०१ विजेत्यांना इस्त्री अशी अनेक बक्षीसांचे वाटप महोत्सवात करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नियम आणि अटी असून गणेश भक्तांनी अंतिम नाव नोंदणी ८ सप्टेंबरपर्यंत करणे आवश्यक आहे. तसेच गणपती सजावटीचे परीक्षण ९ ते १५ सप्टेंबरपर्यंत परीक्षकांकडून केले जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम असणार आहे. सहभागी गणेश भक्तांना बाप्पासोबतची एक सेल्फी व रिल्सही पाठवता येईल.
महोत्सवाचे आयोजक चंद्रकांत नखाते म्हणाले, ”चिंचवड मतदार संघातील गणेश भक्तांसाठी दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा ‘गौरवशाली गणेशमहोत्सवा’चे आयोजन केले आहे. ‘घरगुती गणपती सजावटी’ला हक्काचं व्यासपीठ मिळावे आणि त्या माध्यमातून गणेश भक्तांना बक्षिसांची देखील लयलूट करता, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन नखाते यांनी केले आहे.
















