न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२४) :- गणेशोत्सवाला आज शनिवारपासून (दि. ७) प्रारंभ होत आहे. पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या वतीने शहर व उपनगर परिसरामध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी तीन हजार पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत.
उत्सवाच्या काळात संभाव्य घातपाती कारवाया, अनुचित घटनांचा धोका लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस आयुक्त, सहायक पोलिस उपायुक्त, ११ सहायक पोलिस आयुक्त, ५३ पोलिस निरीक्षक, २४५ सहायकपोलिस निरीक्षक, २ हजार ३३८ पोलिस अंमलदार, ५५० होमगार्ड, एक एसआरपीएफ कंपनी, बीडीएस पथक, एवढा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलिस स्टेशनअंतर्गत सर्व गणेश मंडळांच्या व शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये गणेशोत्सव हा उत्साहाने साजरा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
















