न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२४) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) कंत्राटी नवीन कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अभियंता, संगणक, चालक व शिपाई या पदासाठी मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. मुलाखतीनंतर अंतिम निवड यादी निश्चित करण्यात येणार आहे.
पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयात काम करणा-या २०९ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कालावधी संपुष्टात आला आहे. खासगी संस्थांमार्फत कर्मचारी भरती केली जात आहे. एका खासगी एजन्सीच्या माध्यमातून पीएमआरडीएच्या प्रशासकीय सेवेत अभियंता सह चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत.
१२ अभियंता, सात संगणक चालक, चार शिपाई आदी पदांसाठी भरती केली जात आहे. तीन सदस्यीय समितीद्वारे मुलाखती घेण्यात येत आहेत. अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, वित्तीय नियंत्रक पद्मश्री तळदेकर तसेच विभाग प्रमुख अशा तीन अधिकाऱ्यांचा समितीमध्ये समावेश आहे.
पीएमआरडीए कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कालावधी नुकताच संपुष्टात आला. त्यांच्या जागी आता बाह्यस्त्रोतामार्फत अभियंता, शिपाई, संगणक चालक यांच्या मुलाखती सुरू आहेत.
– सुनील पांढरे, सह आयुक्त, प्रशासन विभाग…












