न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२४) :- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने देशातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समाजविभूषित मान्यवरांना “राष्ट्रीय आयकॉन ” या प्रतिष्टीत पुरस्काराने सन्मानित केले गेले. नाशिक येथील रोटरी क्लब सभागृहात सदरचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती खासदार भास्कर भगरे सर,महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष सुधाकरजी साळी, ग्राहक रक्षक समितीच्या राष्टीय अध्यक्षा डॉ.आशाताई पाटील,पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील, कार्यक्रम संयोजिका माधुरी देशपांडे, कृतिका मराठे, अभिनेत्री करिश्मा चव्हाण यांची होती. कार्यक्रमास विविध राज्यातून आलेले मान्यवर पुरस्कार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी खासदार भास्कर भगरे म्हणाले,”मी सुद्धा सामान्य कुटुंबातील एक शिक्षक असून लोकांच्या पाठिंब्यामुळेच संसदेत पोहचलो.हा सर्वात मोठ्या लोकशाहीचा चमत्कार म्हणावा लागेल. गेल्या १० वर्षांपासून गुरुजनांचा सन्मान करण्याची परंपरा डॉ महेंद्र देशपांडे यांनी जपली आहे.देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यरत असणाऱ्या समाजविभूषित मान्यवरांच्या पाठीवर कौतुकाची थापहि मह्त्वाची.पुरस्कारप्राप्त झालेल्या सर्व मान्यवरांचे मी अभिनंदन करतो.
खासदार भास्कर भगरे व व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय झेप घेणाऱ्या डॉ विजयकुमार पाटील,केशव इंडाईत,विनोद सवडतकर,डॉ.ज्ञानेश्वर साळुंखे,सचिन वझरे, धर्मा देवरे, उरळी कांचन चे प्राध्यापक सुरेश वाळेकर, रियाझ शेख यांचा “राष्ट्रीय बिजनेस आयकॉन” या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी साधना भानुशाली यांच्या “काव्य साधना” या कवितासंग्रह पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले. आभार प्रदर्शन माधुरी देशपांडे यांनी केले.
















