- मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या प्रयत्नांना यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२४) :- मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सोमवारी पालिका अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यासोबत देवी आई माता आणि दत्त मंदिराजवळील पवना नदीवर पिंपरी ते पिंपळे सौदागर दरम्यान सुरु असलेल्या नवीन पुलाच्या कामाची पाहणी केली.
या ठिकाणी सतत होणारी वाहतुक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याच्या दृष्टीने हा नव्याने बांधण्यात येणारे पूल खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. परिसरात दिवसेंदिवस वाढणारी नागरी लोकवस्ती आणि परिणामी रस्तावर वाढणारी अमर्याद अशी वाहतुकीची साधने याचा मोठा ताण पूर्वी असलेल्या जुन्या पुलावर पडत होता. हा पूल अरुंद स्वरूपाचा असल्यामुळे वाहतूक कोंडी होणे स्वाभाविक होते. यावर तोडगा काढण्यासाठीच याच ठिकाणी रुंद असा पूल बांधण्याचे काम नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या सततच्या पाठपुराव्याने सुरू करण्यात आले होते.
या पुलावर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढत असल्याने नागरिकांना सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शत्रुघ्न काटे यांनी महापालिकेच्या प्रशासनाला पूर्व तत्वावर सदर पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावे, अशी सूचना केली आहे. जेणेकरून वाहतूक कोंडी प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. यावेळी शत्रुघ्न काटे यांनी सुरु असलेल्या कामाचा वेग वाढवून उर्वरित पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि पालिका प्रशासन यांना दिल्या आहेत.
















