- ताथवडेत दोन वाहनांना धडक देत घेतला एकाचा बळी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२४) :- मनपाच्या कचरा गोळा करणाऱ्या ट्रक (एमएच१४एचयु२५९०) वरील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक हा दारू पिऊन, भरधाव वेगाने, हयगयीने चालवला. तरुणाच्या टु व्हीलरला पाठीमागुन धडक दिली. तरुणाच्या पायास दुखापत करून गाडीचे नुकसान केले.
तसेच पल्सर (एमएच३१डीएम०६७९) वरील अमोल चंदु फलके (वय ४५ वर्षे रा.सेलेस्टीयल सिटी फेज-२ रावेत) यांच्या गाडीला धडक देवुन त्यात गाडीचे नुकसान केले. अमोल चंदु फलके यांना गंभीर दुखापत करून त्यांच्या मृत्युस कारणीभुत झाला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.०९) रोजी दुपारी ४.१५ वाजताचे सुमारास भुमकर चौकाकडुन ताथवडे बाजुस सर्व्हिस रस्त्याने जात असताना डिकेथलॉन स्टोअर समोरील रस्त्यावर, ताथवडे येथे घडला.
फिर्यादी अक्षय दिगंबर गिरी (वय २० वर्ष, ताथवडे) यांनी आरोपी लोकेश रामे गौडा (वय ४५ वर्षे रा. घरकुल चिखली) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. वाकड पोलिसांनी ९८३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६ (१), १२५ अ, ३२४ (४) मो.वा. कायदा कलम १८४,१८५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोउपनि सुर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.
















