न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर उपायुक्त पदावर कार्यरत असलेले रविकिरण घोडके यांची पनवेल महापालिकेच्या उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे घोडके यांना पिंपरी चिंचवड महापालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
रविकिरण घोडके यांची राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली होती. या कालावधीत घोडके यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान, जनसंपर्क अशा विविध विभागांमध्ये सेवा बजावली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांच्या कार्यमुक्तीचा आदेश काढला आहे.
















