न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक सुरळीत व सुरक्षित रहावी यासाठी वाहतुक पोलीस व मेडिकव्हर हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यामाने वाहतुक सुरक्षा सप्ताह अभियानाची सुरवात करण्यात आली. या अभियानाचा उद्देश पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जनजागृती करणे आणि सुरक्षित वाहतुकीचा प्रसार करणे आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन बापू बांगर पोलीस उपायुक्त, वाहतुक शाखा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाहतुक नियोजन विभागाचे पोलीस निरीक्षक सुनिल पिंजण व वाहतुक पोलीस अंमलदार तसेच मेडीकव्हर हॉस्पीटल भोसरीचे प्रमुख डॉ. व्यास मौर्या, मार्केटिग प्रमुख अमोल मुळे, मॅनेजर सुमित चौधरी, अमोल कवडे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी पोलीस उपायुक्तांनी रस्ता सुरक्षेचे महत्व आणि नागरिकांच्या कल्याणासाठी असे उपक्रम राबविणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच या मोहिमेव्दारे अपघात आणि मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरक्षित वाहतुक अभियानाची मोलाची मदत होईल असे मत व्यक्त केले आहे.
















