न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 13 सप्टेंबर 2024) :- राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकास पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. विनोद नढे असं त्यांचं नाव असून त्यांच्या परवानाधारक बंदुकीतून चुलत भावाने भिंतीवर गोळी झाडली आहे.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विनोद नढे यांच्यावर निष्काळजीपणाचा आणि सचिन नढे वरती जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
काळेवाडी येथील नढेनगरमध्ये ही घटना घडली होती. गोळीबाराच्या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. हा गोळीबार नेमका कोणावर करण्यात आला, का केला असे प्रश्न निर्माण झाले होते.
या घटनेबाबत माहिती देताना पोलीसांनी सांगितलं की, सचिन नढे, विनोद नढे, तुकाराम नढे, माऊली नढे हे काळेवाडी पेट्रोल पंपासमोर असेलल्या राहुल बार अँड खुशबू हॉटेलमध्ये बसले होते. हॉटेलचे मॅनेजरला फटाक्यासारखा मोठा आवाज आला. त्यांनी जाऊन पाहिले असता सचिन नढेच्या हातामध्ये लोखंडी रिव्हॉल्वर होते. त्याने लोखंडी रिव्हॉल्वरने जेवणाच्या प्लेट ठेवण्याच्या पत्र्याच्या सर्विस टेबलवर फायर केला. गोळीबार झाल्यानंतर हॉटेल मधील ग्राहक घाबरून पळून गेले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विनोद नढे हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत.
















