- दोघेजण चिखली पोलिसांच्या ताब्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२४) :- MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP या औषधाचा उपयोग LOW BLOOD PRESSURE या आजारावर केला जात असुन त्याचा दुरोपयोग To achieve better physical performance यासाठी करतात. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम drowsiness, incoherence halluci nations, convulsions, slow heart rate असा होतो.
डॉक्टरांच्या प्रिस्किप्शन शिवाय विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे हे माहित असतानाही दोघांनी विक्री करण्याकरीता ठेवुन इंजेक्शनी मागणी करणा-या इसमांकडुन पैसे घेवुन त्यांना MEPHENTERMINE SULPHATE INJECTION I.P. या औषधाचे इंजेक्शन दिले. दोघांच्या ताब्यात ७०,००० रु. किं ची एक हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटार सायकल (एमएच १४ डीजेड ४०४७), ७०,००० रु कि ची एक होंडा अॅक्टीवा ५ जी क एमएच १४ एचएल ८७१५,६०,००० रु कि चे दोन मोबाईल फोन, ५०० रु कि ची सँग व ३२,४५०/- रु किं चे औषधे असे एकुण २.३२.९५१.६० साहित्य मिळुन आले.
सदरचे इंजेक्शन घेणा-या व्यक्तिच्या जिवीतास धोका किंवा आरोग्यास गंभीर इजा होवु शकते हे माहित असताना देखील वरिल इंजेक्शन अवैधरित्या ऑनलाईन इंडिया मार्टकडून प्राप्त करुन घेवुन गैरवापर करण्याच्या उद्देशाने अनाधिकाराने गैरकायदेशिररित्या विक्री करण्याकरीता कब्जात बाळगले. हा प्रकार (दि. ११) रोजी रात्री १०.३० वा चे सुमारास चिखली आकुर्डी रोड कडेला, ओम शिव शंभो, एच.पी. पेट्रोल पंपाचे बाजुस, नेवाळेवस्ती, चिखली येथे घडला.
याप्रकरणी १) सुमित गणेश पिल्ले (वय ३२ वर्षे रा. संत तुकाराम नगर, नेवाळेवस्ती, चिखली-आकुर्डीरोड, चिखली), २) कनिष्कराज ऊर्फ राणा अरुण सुरवसे (वय २१ वर्षे, रा. गल्ली नं. ३, शरदनगर, चिखली) यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात ५२९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२७८, १२५,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोउपनि पंचमुख तपास करीत आहेत.
















