न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२४) :- वाकड येथील कस्पटे वस्तीत श्रीराम फ्रेश मार्ट येथे एकुण ४१,२३९ रुपये किंमतचा हारपिक, लायझॉल, कॉलीन या रेकिट बेंकिसर (इंडिया) प्रा.लि. कंपनीचे बनावट टॉयलेट, बाथरुम व ग्लास क्लिनर विक्रीसाठी ठेवले.
ग्राहक व कंपनीची फसवणुक केली. चेतन मोतीराम गणात्रा यांनी आरोपी छोगाराम घिसाराम चौधरी यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी १००१/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४) कॉपी राईट कायदा १९५७ चे कलम ५१ (ब), ६३ नुसार गुन्हा सखल करीत आरोपीला समजपत्रावर मुक्त केले आहे. पोउपनि चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
















