न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२४) :- म्हाडामध्ये स्वस्तात घर व दुकान मिळवून देतो, असे सांगत एकाची आर्थिक फसवणूक केली. ही घटना १० सप्टेंबर २०२० ते ४ जानेवारी २०२४ या कालावधीत पिंपरी येथे घडली. याप्रकरणी मुर्जी गोविंद गजोरा (वय २८, रा. मोरवाडी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार उमाकांत रामदास ढाके (वय ५४), शुभम उमाकांत ढाके (३१) व एक महिला यांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी व साक्षीदार मानसी संतोष जगतकर, निदा अर्शद सिद्धीकी, चंपालाल रूपाराम जाट यांना म्हाडाच्या स्किममध्ये स्वस्तात घर आणि दुकान मिळवून देतो असे सांगितले.
फिर्यादी यांना घर मंजूर झालेले नसतानाही त्यांच्या नावाचे १५ एम स्ट्रीट रहाटणी या इमारतीमध्ये २ बीएचके फ्लॅट मंजुरीचे बनावट कागदपत्र बनवले.
















