न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- स्वतःच्या प्रसिध्दीसाठी नारायण राणे वेळोवेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टिका करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे.
”नारायण राणे यांना पक्षात ठेवले तर, रश्मीसह घर सोडेन”, अशी धमकी उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना दिली होती, असे राणेंनी स्वतःच्या आत्मचरित्रात लिहले आहे. वास्तविक पाहता हा आरोप बिनबुडाचा आहे.
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची समाजाविषयी प्रेम तसेच शेतकरी बांधवांसाठी काहीतरी चांगल करण्याची तळमळ, हा उभा महाराष्ट्र पाहतच आहे. स्वतःच्या आत्मचरित्र लिखाणाच्या प्रतींचा खप होण्यासाठी हा केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, असे दाखले यांनी म्हटले आहे.











