- मूर्ती संकलन, वाहतूक नियोजन, विसर्जन बंदोबस्तात हिरारीने सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२४) :- यंदाच्या गणेशोत्सव महापालिका प्रशासनाच्या तसेच शहर पोलीस प्रशासनाच्या सहयोगाने तसेच स्वयंसेवक व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या एसपीओंच्या मदतीने विसर्जन सोहळा आनंदाने पार पडला. शहरातील प्रमुख विसर्जन घाट मळेकर वस्ती,वाल्हेकरवाडी, रावेत, चिंचवड ,पूर्णानगर, गणेश तलाव या ठिकाणी २६००० पेक्षा जास्त घरगुती गणपतींचे विसर्जन झाले तर १६० पेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती पवना नदीमध्ये विसर्जित करण्यात आले. स्वयंसेवकांच्या व पोलिस मित्रांच्या साहाय्याने नागरिकांना विसर्जनात कोणतीच अडचण निर्माण झाली नाही.
सर्व ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने निर्माल्य संकलन करून साडे तीन टनापेक्षा जास्त निर्माल्य जमा केले गेले. त्याचप्रमाणे चिखली चौक, शाहूनगर, पूर्णानगर, संभाजी चौक, हुतात्मा चौक, निगडी चौक, गणेश तलाव परिसर या ठिकाणी पार्किंग व्यवस्था व वाहतूक नियोजनासाठी स्वयंसेवकानी पोलीस विभागास सहकार्य केले. मूर्ती संकलनासाठी गणेश तलाव परिसरात समितीच्या स्वयंसेवकानी भाविकांना सहकार्य केले. या परिसरात पोलीस उपनिरिक्षक रवींद्र आहेरराव यांनी स्वयंसेवकाना मार्गदर्शन केले.
शहरातील विविध घाटांवर सतीश देशमुख, विजय मुनोत, विशाल शेवाळे, राजेंद्र कुंवर, नितीन ढमणगे, सातप्पा पाटील,लक्ष्मण इंगवले,राजेंद्र येळवंडे, गोपाळ बिरारी,शशिकांत इंगळे, प्रकाश पानस्कर, सुरेश गावडे, संजय महाजन, कडूबाळ शिंदे, संजय कांबळे, उत्तम सादळकर, बळीराम शेवते, विजय जगताप, देवजी सापरिया, राजेंद्र झावरे,विक्रम पाणारी, लहू पाटील, रवींद्र पवार, तेजस सकट, उद्धव कुंभार, निलेश ढेकाने, रवींद्र बिडकर, संभाजी गुंजाळ, इस्माईल मुलांनी,किशोर कदम, संतोष कदम, दत्ता चव्हाण, बापूराव खोटे, आयुब शेख, राम सुर्वे, रवींद्र जांभळे, नितीन मांडवे, अजय घाडी, सुकेश येरूनकर, सतीश मांडवे, राजेश बाबर, संतोष चव्हाण, सुभाष माने,राजेश ,रवींद्र पवार,संजय कांबळे,भरत बारी,संजय पुंड,दिगंबर बालगुडे ,विजय चौगुले, धनाजी आव्हाड,संजय गोरखा यांनी विभाग समन्वयक म्हणून काम पाहिले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे म्हणाले,” यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांच्या स्वयंशिस्तीमुळे तसेच पोलिस मित्रांच्या सहकार्यामुळे पोलीस प्रशासनावर चा अतिरिक्त त्राण नक्कीच कमी झाला. त्याचप्रणाने वाहतूक नियोजनही योग्य प्रकारे पार पडले.”
वाहतूक विभाग निगडी च्या पोलीस निरीक्षक म्हणाल्या,” तीन फुटापेक्षा मोठे गणपती वाल्हेकरवाडी येथे पवना नदीवर सार्वजनिक मंडळांनी विसर्जित केल्याने गणेश तलाव येथे घरगुती गणपती विसर्जन शांततेत पार पडले, स्वयंसेवकांनी कार पार्किंग व्यवस्था चोख हाताळली.”
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे राज्य अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले,” यंदाच्या वर्षी पीओपी गणेश मूर्त्यांच्या विघटनासाठी महापालिका प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने नागरिकांना पर्यवारण पूरक गणेशाचे महत्व लक्षात आले. यंदाच्या वर्षी अनंत चतुर्दशीला समितीच्या १५० स्वयंसेवकांनी प्रशासनाला सहकार्य केले.”














