न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२४) :- महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना सरचिटणीस मधुकर सुरवडे यांना ‘महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार २०२२’ आणि संघटनेचे केंद्रीय सहसचिव राजेश गाढवे यांना ‘राज्यस्तरीय कामगार भूषण पुरस्कार २०२४’ जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना प्रादेशिक सल्लागार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहर संघटक संतोष रमाकांत सौंदणकर यांच्या संपर्क कार्यालयात या दोघांचा सत्कार संतोष रमाकांत सौंदणकर यांच्या हस्ते करण्यात आला.
मधुकर सुरवडे यांच्या हस्ते गणेश जाधव यांना महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना पुणे परिमंडळ सचिव म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच सुनील वाघ यांना संघटनेत प्रवेश देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना पुणे प्रादेशिक उपाध्यक्ष निलेश मानकर, पुणे परिमंडळ अध्यक्ष मनोहर शिंदे, पुणे परिमंडळ माजी सचिव महेश दरेकर हे उपस्थित होते.














