न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२४) :- पिंपळे निलख येथील स्मशानभूमी परिसरातून वाहणाऱ्या मुळा नदीपात्रात दुषित व केमिकल मिश्रीत पाण्यामुळे मृत माशांचा खच पडला.
गेल्या वर्षीसुद्धा पवना नदीपात्रातील केजुबाई धरण येथे सुद्धा असाच माशांचा खच आढळून आला. हे सर्व वारंवार घडत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने फक्त बघ्याची भुमिका घेतली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातुन वाहणाऱ्या तीन्ही नदीपात्रावर असलेल्या एसटीपी प्रकल्पांची त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे नेते रविराज काळे आयुक्तांना भेटून केली. पर्यावरण विभागचे मुख्य अभियंता यांना मृत मासे भेट दिले
















