न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सुदुंबरे (दि. २४ सप्टेंबर २०२४) :- रयत शिक्षण संस्थेचे संत तुकाराम विद्यालय देहू,भाग शाळा, सुदुंबरेमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती नुकतीच उत्साहात साजरी झाली.
यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भव्य अशी ‘मिरवणूक’ काढण्यात आली होती. ढोल-ताशाच्या गजरात मुलानी सहभाग घेतला.
मुख्याध्यापक पुजारी बी. एस, उपमुख्याध्यापिका कांबळे, पर्यवेक्षिका पठाण, उपशिक्षक सय्यद, भांबुरे, टिळेकर, शेटे, ग्रंथपाल माने त्याचप्रमाणे सुदुंबरे गावातील ग्रामस्थ व युवा नेते माणिक गाडे, सुरेश गाडे, संत जगनाडे महाराज ट्रस्टचे व्यवस्थापक चंद्रकांत जाधव, ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी वर्ग आदींनी जयंती मिरवणुकीत सहभाग घेतला.
















