न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ९ मे २०१९) :- उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. भोसरी परिसरातील पालिकेच्या वतीने लावण्यात आलेली झाडांची पुरेशा पाण्याअभावी दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणची झाडे वाळून चालली आहेत.
सामाजिक बांधिलकी जोपासत भोसरीतील युवकांनी पढाकार घेऊन स्वखर्चाने या झाडांना पाणी दिले. या उपक्रमाचे परिसरात नागरिकांकडुन कौतूक होत आहे. वाढलेले तापमान व पाणी उपलब्ध नसल्याने तसेच पालिकेचे उद्यान विभागाची उदासीनता, यामुळे दिवसेंदिवस झाडे वाळत चालली आहेत. मात्र, झाडे कुठल्याही परिस्थितीत जगविण्याचा युवा प्रतिष्ठानच्या युवकांनी स्वखर्चाने टँकरची व्यवस्था करून, झाडांना पाणी दिले आहे.
या उपक्रमासाठी स्वीकृत सदस्य गोपीआप्पा धावडे, सुनील लांडगे, संतोष देवकर, दीपक बोराटे, नितीन धावडे, अनिल हूलावळे, सुरदास फुगे, तसेच गुड़ मॉर्निग ग्रुप युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.


















