न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०१९) :- श्री ज्ञान विकास केंद्र व आर्ट ऑफ हॅपीपेस्ट लिव्हिंगतर्फे निगडी येथे १३ ते १९ मे दरम्यान मोफत प्राणायाम व ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या मनोहर वाढोकर सभागृहात पहाटे ४ ते ६ पर्यंत हे शिबिर घेण्यात येणार आहे. दहा वर्षांच्या पुढील व्यक्तींना या शिबिरात सहभागी होता येणार आहे.











