- युवक काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२४) :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५५व्या जयंती दिनानिमित्त शहर युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जीवनावरील आणि स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सजी वर्की आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने काळेवाडीतील अलफोन्सा शाळेजवळ असलेल्या कोकण कारवार सभागृहात बुधवारी (दि. २ ऑक्टोबर) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सदर प्रदर्शन भरविण्यात येणार असून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. तसेच या हे प्रदर्शन विनामूल्य असणार आहे.
यासंदर्भात बोलताना आयोजक चंद्रशेखर जाधव म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अखंड भरतवासीयांचे नेतृत्व ते देशाचे राष्ट्रपिता हा महात्मा गांधी यांचा असामान्य प्रवास अधोरेखित करण्याचा छोटासा प्रयत्न या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न आहे. फक्त स्वातंत्र्य योद्धा म्हणूनच नव्हे तर सामाजिक चळवळीत काम करीत असताना जाती-वर्ण व्यवस्थेविरोधातील त्यांचा लढा, स्वदेशी वस्तूंसाठी दिलेला लढा त्याचबरोबर अनेक लढ्यात अहिंसेच्या माध्यमातून त्यांनी केलेला संघर्ष याचीही माहिती आपल्या नवीन पिढीला व्हावी या उद्देशाने आम्ही या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असून नागरिकांनी आपल्या पाल्यांसह हे प्रदर्शन पाहावे, असे आवाहनही आयोजक जाधव यांनी यावेळी केले आहे.













