- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचे आवाहन अनं उत्सवानिमित्त सूचना…
 
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२४) :- आगामी नवरात्र उत्सव नागरिकांनी अतिशय शांततेत व उत्साहात पार पाडावा या उद्देशाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ १,२,३ कार्यालय येथे प्रत्यक्षात भेट देऊन आढावा घेतला.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणारे १८ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने सुचना दिल्या. पोलिसांना सहकार्य करून नागरिकांनी अतिशय शांततेत,आनंदात नवरात्र उत्सव पार पाडावा, असे आवाहन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले.
याप्रसंगी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा संदिप डोईफोडे, विशाल गायकवाड पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ स्वप्ना गोरे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१ डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३ ,सहायक पोलीस आयुक्त पिंपरी सचिन हिरे, सहायक पोलीस आयुक्त चिंचवड विभाग मुगुटराव पाटील, राजेद्रसिंह गौर सहा.पोलीस आयुक्त चाकण विभाग व संबंधित विभागातील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आदी उपस्थित होते.
- १) नवरात्र उत्सवामध्ये दांडिया खेळणाऱ्या ठिकाणी व आजूबाजूचे परिसरात आवश्यक तो बंदोबस्त लावणेत यावा
 - २) दांडिया खेळणाऱ्या ठिकाणी मंडळाचे मार्फतीने पर्याप्त सिसिटीवी कॅमेरे लावावेत.
 - ३) संपुर्ण नवरात्र उत्सवादरम्यान दांडिया,गरबा खेळणाऱ्या ठिकाणी व इतरत्र महिला व लहान मुलींचे बाबतीत छेडछाड होणार नाही याबाबत दक्षता घेतील.
 - ४) देवीची मुर्ती असलेली ठिकाणे , दांडिया,गरबा खेळणारे ठिकाणी मंडळे पर्याप्त स्वयंसेवक नेमतील.
 - ५) हद्दीतील पार्क.गार्डन, मोकळी मैदाने ,सार्वजनिक गर्दीची ठिकाने या जागी पोलीस स्टेशन पेट्रोलिंग वाहने, बीट मार्शल्स डी.बी पथक यांचेमार्फतीने सतत चेक करावीत.
 - ६) देवीची मिरवणुक मार्ग, दुर्गा दौड मार्ग इत्यादी मार्गांची आगाऊ तपासणी करून घ्यावे.
 - ७) देवी बसलेली ठिकाणे,गरबा, दांडिया खेळणारी तसेच गर्दीचे ठिकाणी मोकाट जनावरे फिरणार नाहीत या अनुषंगाने मोकाट जनावरांचा योग्य तो बंदोबस्त करावा.
 - ८) दररोज गर्दीचे ठिकाणी पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेतील अधिकारी व अमंलदार पायी पेट्रोलिंग करतील
 - ९)सदर नवरात्र उत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेचे दृष्टीने सर्वांनी अथक परिश्रम घ्यावे.
 
                                                                    
                        		                    
							












