न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२४) :-दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्या दोघांना पोलीस समजाऊन सांगत होते. मात्र, मद्यपी दोघांनी त्यांना अश्लील शिवीगाळ करुन व धमकावून धक्काबुकी केली. मोठमोठ्या आवाजात उध्दटपणे व असभ्यपणाचे त्यांच्यासोबत वर्तन केले. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस वाहनातुन पोलीस स्टेशनला आणले. तिथे त्यानी डी.बी.रुम मध्ये आरडा ओरडा करुन गोंधळ घातला. त्यावेळी पोलीस स्टेशनला पोलीस गणवेशात कर्तव्यावर असणारे पोलीस शिपाई कच्छवे यांना आरोपी यांनी शिवीगाळ करुन धक्काबुकी करुन सरकारी कर्तव्य बजवण्यापासुन परावृत्त केले.
हा प्रकार (दि.०३) रोजी दुपारी १२.१९ वा. एम. के. चौक, नवी सांगवी येथे घडला. याप्रकरणी आरोपी १) संजय अशोक साळवी (वय. ६० वर्षे रा. संत तुकारामनगर, एम. के. चौक स.नं. ६६ लेननंबर १ नवी सांगवी), २) योगेश मारुती पाटील (वय ४१ वर्षे रा. संत तुकारामनगर, एम. के. चौक स.नं. ६६ लेननंबर १ नवी सांगवी) या दोघांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात ४१६/२०२४ बी.एन.एस. २०२३ कलम १३२,१२१(१),२९६,२२४,३५५,३(५) सह कलम महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११२/११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एन.बी. चापाले पोलीस उप-निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.













