न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- दारू आणण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून चौघांनी मिळून तरुणावर हल्ला चढवला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. ८) रात्री आठच्या सुमारास रहाटणीतील गजानन चौक येथे घडली.
प्रशांत खराडे (२६, रा. रहाटणी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रदीप श्रीमंत गोंडगिरे (२७, रा. रहाटणी फाटा) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार बापू सातपुते, आपू सातपुते ( दोघे रा. रहाटणी) यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











