- विविध नागरी सेवा सुविधांसाठी पालिकेकडून सुधारित दर निश्चित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२४) :- महापालिकेच्या नगररचना व विकास विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवा सुविधांसाठी सुधारित दर निश्चित करण्यात आले असून या विषयांसह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत मान्यता दिली.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांना प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील तसेच महाराष्ट्रातील वेगाने वाढणारे शहर असून गेल्या २० वर्षात शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. महाराष्ट्र शासनाची एकत्रितकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार (युडीसीपीआर-२०२०) नवीन नागरी सुविधा सेवांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यानुसार नगररचना व विकास विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवा सुविधांबाबतच्या सेवा शुल्कामध्ये सुधारणा करणे व नवीन सेवा आणि सेवांसाठीचा दर निश्चित करणे आवश्यक होते. तसेच पिपंरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नागरी सेवा पुरविताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताण येत असल्याने महापालिकेच्या महसुलात वाढ होण्यासाठी या सुधारित शुल्काबाबतच्या २३ सेवा व त्यांचे दर निश्चितीच्या विषयाला प्रशासक सिंह यांनी आज मान्यता दिली.
बैठकीत मंजूर विषय..
महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी एक फ्लड रेस्क्यू व्हॅन खरेदी करणे, २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ या तीन वर्षातील एकेरी पद्धतीने तयार केलेल्या वार्षिक लेख्यांना मान्यता देणे, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक उपकरणे खरेदी करणे, तसेच महापालिकेच्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही यंत्रणेची वार्षिक तत्वावर देखभाल दुरुस्ती करणे आदी विषयांना प्रशासक सिंह यांनी आज मान्यता दिली.
| अ.क्र. | नगररचना विभागाकडील सुविधा | सध्याचा दर र.रू. | प्रस्तावित दर र.रू. |
| १ | झोन दाखला | र.रू.१००/- प्रति स.नं. | र.रू.३००/- प्रति स.नं. |
| २ | भाग नकाशा (रंगीत)
(अ) २०X३० सें.मी.(A-४ Size) (ब)नकाशा ३०X४५ सें.मी.(A-३ Size) (क) नकाशा ४५X६० सें.मी.(A-२ Size) (ड) नकाशा ६०X९० सें.मी.(A-१ Size) (इ) नकाशा ७५X१०५ सें.मी.(A-० Size)
|
र.रू.१५०/- प्रति स.नं. – – – –
|
र.रू.७००/- प्रति स.नं. र.रू.११००/- प्रति स.नं. र.रू.१५००/- प्रति स.नं. र.रू.२५००/- प्रति स.नं. र.रू.६८००/- प्रति स.नं. |
| अ.क्र. | नगररचना विभागाकडील सुविधा | सध्याचा दर र.रू. | प्रस्तावित दर र.रू. |
| ३. | नगररचना योजनेतील एक अंतिम व त्याचा मूळ भूखंड दर्शविणारा नकाशा | – | र.रू.७००/- (प्रति १ रंगीत प्रत) |
| ४. | नगररचना योजनेतील दोन अंतिम भूखंड व त्यांच्या मूळ भूखंडाचा भाग नकाशा | – | र.रू.१५००/- (प्रति १ रंगीत प्रत) |
| ५ | दोन पेक्षा अधिक अंतिम भूखंड व त्यांच्या मूळ भूखंडाचा भाग नकाशा | – | र.रू.२५००/- (प्रति १ रंगीत प्रत) |
| ६ | मंजूर नगर रचना योजनेतील अंतिम भूखंडाच्या सदनेच्या प्रथम प्रतीसाठी | – | र.रू.३०००/- (प्रति १ रंगीत प्रत) |
| ७ | मंजूर नगर रचना योजनेतील अंतिम भूखंडाच्या सदनेच्या दुसऱ्या प्रतीसाठी | – | र.रू.८००/- (प्रति १ रंगीत प्रत) |
| ८ | मंजूर नगर रचना योजनेच्या योजना पुस्तकामधील एका अंतिम भूखंडाच्या नोंदीच्या उताऱ्यासाठी | – | र.रू.२००/- (प्रति १ रंगीत प्रत) |
| ९ | विकास योजना नकाशे/ भाग नकाशे यांची सी.डी. पुरविणे (१ जी.बी.पर्यंत सीडीसाठी) | – | र.रू.५००/- (प्रति १ जी.बी.पर्यंत सीडीसाठी)) |
| १० | रंगीत नकाशा प्रत्येक शीट | र.रू.५००/- प्रत्येकी | र.रू.१०००/- प्रत्येकी |
| ११ | नवीन डेव्हलपमेंन्ट प्लॅन | र.रू.१००००/- | र.रू.२००००/- |
| १२ | जूना डेव्हलपमेंन्ट प्लॅन | र.रू.८०००/
(२६ शिटसाठी) (र.रू.५००/- प्रति शीटस) |
र.रू.१५०००/-
(२६ शिटसाठी) ( र.रू.१०००/- प्रति शीटस) |
| १३ | मंजूर विकास योजना अभिप्राय | र.रू.२५०/-
(प्रत्येक १०० चौ.मी. क्षेत्रासाठी) |
र.रू.५००/-
(प्रत्येक १०० चौ.मी. क्षेत्रासाठी) |
| १४ | मंजूर विकास योजना अभिप्राय जादा प्रत | र.रू.२५०/-
(प्रत्येक १०० चौ.मी. क्षेत्रासाठी) |
र.रू.२०००/-
(प्रत्येक जादा प्रतीसाठी) |
| १५ | सेट बॅक तपासणी
(प्रत्येक इमारतीमागे) |
र.रू.२५०/-
(प्रत्येक १०० चौ.मी. क्षेत्रासाठी) |
र.रू.५००/-
(प्रत्येक १०० चौ.मी. क्षेत्रासाठी) |
| १६ | प्रपत्र अ व ब देणे
प्रपत्र अ व ब गहाळ प्रकरणी नवीन प्रपत्र देणे |
र.रू.१००/- प्रति स.नं.
र.रू१०००/- प्रति स.नं.
|
र.रू.१००/- प्रति स.नं.
र.रू.१०००/- प्रति स.नं.
|
| अ.क्र. | नगररचना विभागाकडील सुविधा | सध्याचा दर र.रू. | प्रस्तावित दर र.रू. |
| १७ | विकास हक्क प्रमाणपत्र (TDR) प्रकरणासाठी छाननी शुल्क | र.रू.५/- प्रति चौ.मी.
(कमीत कमी र.रू.१०००/- व जास्ती जास्त र.रू.२००००/-) |
र.रू.१०/- प्रति चौ.मी.
(कमीत कमी र.रू.५०००/- व जास्ती जास्त र.रू.३००००/-) |
| १८ | चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) प्रकरणासाठी छाननी शुल्क | र.रू.५/- प्रति चौ.मी.
(कमीत कमी र.रू.१०००/- व जास्ती जास्त र.रू.२००००/-) |
र.रू.१०/- प्रति चौ.मी.
(कमीत कमी र.रू.५०००/- व जास्ती जास्त र.रू.३००००/-) |
| १९ | Construction Amenity प्रकरणासाठी छाननी शुल्क | – | र.रू.१०/- प्रति चौ.मी.
(कमीत कमी (र.रू.५०००/- व जास्ती जास्त र.रू.३००००/-) |
| २० | Accommodation Reservation प्रकरणासाठी छाननी शुल्क | –
|
र.रू.१०/- प्रति चौ.मी.
|
| २१ | बी.आर.टी.एस. पार्कींग प्रकरण छाननी शुल्क | – | र.रू.५/- प्रति चौ.मी. (र.रू.१०००/- व जास्ती जास्त र.रू.२००००/-) |
| २२ | I2R औद्योगिक क्षेत्र निवासी करणे प्रकरण छाननी शुल्क | – | र.रू.५/- प्रति चौ.मी. (र.रू.१०००/- व जास्ती जास्त र.रू.२००००/-) |
| २३ | विकास हक्क प्रमाणपत्र
अ) गहाळ प्रकरणी नवीन प्रमाणपत्र देणे आ) पुरवणी प्रकरणी प्रमाणपत्र देणे |
र.रू.१००००/- प्रति प्रमाणपत्र
–
|
र.रू.१००००/- प्रति प्रमाणपत्र र.रू.१०००/- प्रति प्रमाणपत्र |












