न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरातील गेल्या २७ वर्षांपासून विविध सामाजिक उप्रकम राबवून सामाजिक बांधीलकी जपणारे तसेच पर्यावरण मित्र, पोलीस मित्र, पक्षीमित्र अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. विजयकुमार पाटील यांची त्यांच्या वाढदिवशी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवले जाणे म्हणजे आपल्या शहरासाठी अभिमानास्पद बाब नक्कीच आहे. असे गौरवोद्गार आमदार उमा खापरे यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त व्यक्त केले. शहरात सामाजिक चळवळ व आंदोलन उभे करणाऱ्यांची व त्यात कित्येक वर्ष टिकून राहणाऱ्यांची व निस्वार्थीपणे समाजसेवा करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजता येईल एवढीच राहिली आहे.मित्रपरिवार सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचा एवढ्या मोठ्या प्रमाणात सन्मान करणे कौतुकास्पद नक्कीच आहे.
तत्पूर्वी आकुर्डी येथील वाढदिवसाचे औचित्य साधुन शहरातील मान्यवरांनी त्यात माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, मोरेश्वर भोंडवे, नांदगाव नगरपरिषद माजी नगराध्यक्षा शकुंतला कवडे, चंद्रहास वाल्हेकर, ईस्कॉन रावेत कृष्ण मंदिर प्रमुख गौरांग दास, जयप्रकाश दास, माहिती अधिकार समिती अध्यक्ष नितीनजी यादव, टाटा कर्मचारी संघाचे राजेंद्र येळवंडे, गुणवंत कामगार संघाचे सचिव राजेश हजारे, झुंज दिव्यांग संस्थेचे राजू हिरवे, लायन्स क्लब आकुर्डीचे अध्यक्ष गोपाळ बिरारी, उद्योजक ब्रिजेशकुमार चौबे, शशी पिल्ले, सुभाषदादा जैन, बालाजी कदम,पत्रकार मिलिंद कांबळे, भास्कर सोनवणे, नंदकुमार साळुंखे, किरण चौधरी,डॉ.राजेश पाटील, मा. उपप्राचार्य प्रमोद पाटील, अवचरे सर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, चिखली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे. शहर युवासेनेचे अध्यक्ष माऊली जगताप, आबा सोनवणे, निलेश शिंदे, सुदाम परब, श्रीकांत हंगे, प्रशांत आगज्ञान, संशोधक आनंद देसाई, निवेदक व कवी राजाराम सावंत, दादाजी पगार, विनायक घोरपडे, विजय जगताप, धीरज नारखेडे ज्येष्ठ नागरिक संघाचे अरविंद कोकणे, अनुभूती ग्रुपच्या सदस्या,खान्देश कन्या कविता पाटील, असे शहरातील विविध क्षेत्रातील प्रमुखांनी उपस्थिती दर्शवली.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक बहिरट, उप प्राचार्य पाटील, पत्रकार साळुंखे यांच्या वतीने वंचित व उपेक्षितांना मदत म्हणून १,३४,८४० रुपयांचा धनादेश समन्वयकांकडे सुपूर्त करण्यात आला. शहरात एकही फ्लेक्स न लावता जमा केलेली रक्कम वंचित व अपेक्षितांना देण्याचा अभिनव उपक्रम ‘पीएनएसकेएस’ संस्थेच्या विभागीय अध्यक्ष, महिला सदस्य व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ह्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबविला.
याप्रसंगी माजी नगरसेवक नामदेव ढाके, मोरेश्वर भोंडवे, प्रभुजी गौरांग दास, राजेंद्र येळवंडे, राजाराम सावंत, करडे काका यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन संतोष चव्हाण , कविता बेंडाळे, सतीश देशमुख, अमोल हेळवार, अनुभूती ग्रुप ,पीएनएसकेएस सदस्यांच्या वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन भरत बारी यांनी केले.












