न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ऑगस्ट किंवा सप्टेंबर २०२० मध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने पिंपरी- चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांनी गुरुवारी (दि. ९) रोजी पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेतली.
नवीन मतदार नोंदणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील २०१६ पर्यंत पदवीधर झाल्याचा सर्व्हे करावा, असा आदेश यावेळी दिला आहे.
भाजप पक्ष कार्यालयात नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, महापौर राहुल जाधव स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, पक्षनेते एकनाथ पवार, अमोल थोरात, पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.











