न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून शहरवासियांनी यंदा वाहन खरेदी केली. आरटीओ कार्यालयात दोन हजार पाचशे वाहनांची नोंद झाली आहे. त्यात १ हजार ७०० दुचाकी नोंदवल्या गेल्या.
या माध्यमातून पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास ८ कोटी २८ लाखांचा यंदा महसुल मिळाला. गतवर्षीच्या तुलनेने तो कमी आहे. नागरिक दिवाळी, दसरा, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करतात. त्याचबरोबर अक्षया तृतीयेचा मुहूर्त साधूनही अनेकांनी यंदा वाहन खरेदी केली.
या मुहूर्तावर वाहनाचे पूजन करता यावे, यासाठी अक्षयातृतीयेच्या पूर्वी तीन ते चार दिवस आधी आरटीओ मध्ये वाहनांची नोंदणी सुरू होती. चार ते सात मेच्या दरम्यान दोन हजार पाचशे वाहनांची आरटीओ मध्ये नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती आनंद पाटील यांनी दिली आहे.











