- पिंपरी मंडईत लाभार्थ्यांना गाळे वाटप तर, वाघेरे कॉलनीत रस्त्याचे भूमिपूजन संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडका लावला आहे. मतदार संघातील नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यात सध्या तरी ते आघाडीवर आहेत. नुकतेच त्यांच्या हस्ते पिंपरीतील भाजी मंडईचे उद्घाटन आणि पिंपरी गावातील वाघेरे कॉलनीतील रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले. तसेच बहुतांशी विकासकामं प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांनी आ. बनसोडे यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून पिंपरीतील भाजी विक्रेते अधिकृत जागेसाठी संघर्ष करीत होते. पाठपुरावा करून त्यांचा प्रश्न आ. बनसोडे यांनी तडीस लावला. उर्वरित भाजीवाले, मसाले व्यवसायिक यांच्यासाठी त्यांनी तब्बल तीनशे गाळ्यांचे नियोजन केले आहे. काही महिन्यातच अत्याधुनिक पार्किंग आणि गाळे उभारणी करून सर्व गोरगरीब विक्रेत्यांना यात समाविष्ट केले जाणार असल्याची माहिती आ. बनसोडे यांनी दिली आहे.
यावेळी माजी नगरसेवक संदीप वाघेरे, निलेश पाढरकर, संजय औसरमल, सतीश लांडगे, संतोष वडमारे, प्रवीण वडमारे, गौतम रोकडे, मुलानी, शिंदे आदी उपस्थित होते.
दरम्यान पिंपरी गावातील वाघेरे कॉलनी क्रमांक २ येथे रस्त्याच्या कॉंक्रेटीकरणाच्या कामाचा श्री गणेशा त्यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेविका उषा वाघेरे, प्रभाकर वाघेरे, ऋषिकेश वाघिरे आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कामाचा अंदाजे खर्च ४०-५० लक्ष आहे. यामध्ये अडथळा निर्माण करणारा महावितरणाचा डीपी लवकरच स्थलांतरीत करणार असल्याची ग्वाही आ. बनसोडे यांनी यावेळी नागरिकांना दिली.
















