न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२४) :- कासारवाडीतील ज्येष्ठ समाजसेवी आणि श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे पूर्व राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोककुमार पगारिया तसेच कासारवाडी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे कार्याध्यक्ष श्रेयस अशोककुमार पगारिया यांना ‘आदर्श पिता पुत्र समाज भूषण’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
चिखलीतील नवचैतन्य सामाजिक संस्थेच्या वतीने हा पुरस्कार आळंदीतीळ जैन स्थानकाच्या सभागृहामध्ये आनंद शिष्यरत्न प्राधाकार, परमपूज्य प्रशांत ऋषीजी आणि परमपूज्य विजय स्मिताजी म सा यांच्या सानिध्यात प्रदान करण्यात आला.
संस्थेच्या अध्यक्षा अनिता नहार, आळंदी संघाचे अध्यक्ष सुरेश काका वडगावकर, ज्येष्ठ समाजसेवी कांतीलालजी मुनोत, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुवालालजी बोरा आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. अशोककुमार पगारिया आणि त्यांचे पुत्र श्रेयस पगारिया या दोघांनीही सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. तसेच त्यांचे चिरंजीव श्रेयस पगारिया हेही जैन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत. त्यामुळे या दोघा पितापुत्रांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली, असं आयोजकांनी सांगितले.











