न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२४) :- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये नवरात्रोत्सव उत्साहात साजरा झाला. भारतीय संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष संदीप काटे यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदीप काटे, पदाधिकारी अनिता काटे, लीना काटे आणि निहारा काटे, शाळेच्या प्राचार्या सुविधा महाले, पालक, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वृंद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इयत्ता ५ वी, ६ वी आणि ७ वी च्या विद्यार्थ्यांनी रामलीला सादर केली. प्रभू श्रीराम यांच्या जीवन चरित्रावर ३० मिनिटांचे नाट्य सादर करण्यात आले होते. शाळेच्या प्राचार्या सुविधा महाले यांनी विद्यार्थ्यांना विजयादशमी उत्सवाचे महत्व समजावले. सायंकाळी शाळेच्या मैदानावर रावण दहन आणि दांडियाचे आयोजन केले होते. विद्यार्थी आणि पालकांनी दांडियाचाही यावेळी आनंद लुटला. विविध खाद्यपदार्थांचेही स्टॉल लावण्यात आले होते.
रामलीलाचे नाट्य लेखन शाळेच्या शिक्षिका अभिलाषा यांनी तर, रामलीलाच्या आयोजनात शिक्षिका दीप्ती आणि सुलक्षणा यांचा मोलाचा सहभाग होता. रावणाचा पुतळा शाळेच्या शिक्षिका अमृता यांनी बनविला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्वल वाघमारे या विद्यार्थ्याने केले.