- बंडोबांचं बंड पक्षश्रेष्ठी कसे शांत करणार?..
- संघाकडूनही उमेदवारीसाठी शंकर जगतापच?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२४) : आठवडाभरात निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच चिंचवड विधानसभेसाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नावावर पक्षाच्या कोअर कमिटीत अंतिम शिक्कामोतर्ब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. फक्त नावाची घोषणा बाकी आहे. यामुळे ‘चिंचवडचा मीच दावेदार’ म्हणवणाऱ्या भल्याभल्यांची दैना उडणार असून, भाजपकडून चिंचवडची उमेदवारी मागणाऱ्या बंडोबांना पक्षश्रेष्ठी कसे शांत करतात? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. राजकीय वर्तुळातही उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.
चिंचवड मतदारसंघावर जगताप कुटुंबाचं नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे. स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप यांचा सहज विजय झाला. त्यांचे दीर आणि भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची राजकीय व्युव्हरचना आणि रणनीती तसेच विश्वासू शिलेदार यांच्या प्रयत्नामुळे हा विजय अगदी सोपा झाला.
मतदार संघात झपाट्याने झालेल्या विकासकामांमुळे जगताप कुटुंबाला मानणारा मोठा वर्ग इथे आहे. त्यामुळे चिंचवड मतदारसंघ हा त्यांचाच बालेकिल्ला समजला जातो. लक्ष्मण भाऊ जगताप यांच्यानंतर त्यांचे राजकीय वारसदार भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप हे देखील त्यांच्याच पाऊलावर पाउल ठेवत त्यांचा राजकीय वारसा निष्ठेने पुढे नेत आहेत. कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांच्या दिमतीला आहे. त्यामुळे पक्षाच्या निरनिराळ्या योजना आणि विकासकामांची जनजागृती तत्परतेने मतदारांमध्ये होत असते.
दरम्यान चिंचवड मतदार संघात पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड-वेणूनगर, चिंचवडगाव, रावेत, मामूर्डी हा उच्चभ्रु आणि आयटीयन्सचा मोठा इलाखा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाचे विचार प्रमाण मानणारा पारंपरिक मतदार इथे वास्तव्यास आहे. शहरध्यक्ष शंकर जगताप यांची शांत, संयमी, सुशिक्षित आणि संघटनात्मक कौशल्य असणारी छबी येथील मतदारांना नेहमीच आकर्षित करीत असते. त्यामुळे त्यांना या परिसरातून भरभरून मतदान होण्याची दाट शक्यता आहे. हीच जमेची बाजू पाहून पक्षश्रेष्ठींची देखील शंकर जगताप यांच्या नावाला पसंती मिळाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
- संघाकडूनही शंकर जगतापच?…
चिंचवड मतदारसंघात संघाचं मोठ जाळ पसरलेलं आहे. संघ आणि स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांचे आपुलकीचे सबंध सर्वश्रुत आहेत. गत निवडणुकां मध्येदेखील संघाची त्यांना झालेली मदत विसरता येणार नाही. स्व. लक्ष्मणभाऊ यांच्या निधनानंतर शंकर जगताप यांनीही विविध माध्यमातून संघाची नाळ अधिक घट्ट केल्याचे समजते. त्यामुळेच संघाकडूनही त्यांच्या उमेदवारीला हिरवा झेंडा दाखवण्यात आल्याचं समजतं.
- भाजपकडून हे आहेत प्रबळ इच्छुक उमेदवार…
माजी नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे…
















