न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. १० मे २०१९) :- डॉ. डी.वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी, येथे अहमदाबाद स्थित कॅडीला कंपनीच्या सहकार्याने नोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी सामूहिक मुलाखती घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये कॅंपस मधील ८ महाविद्यालयातील ८२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कॅडीला कंपनीच्या ५ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण विद्यार्थ्यांची विविध स्तरावरील मुलाखत घेतली आणि ६ महाविद्यालयातील एकूण १८ विद्यार्थ्यांची निवड केली.
महाविद्यालयाच्या परीक्षण व नियुक्ती अधिकारी शुभांगी जाधव आणि सुप्रिया माने सहायक प्रशिक्षण आणि व्यवस्थापन अधिकारी यांनी या मेळाव्याचे नियोजन जस्मिता कौर व प्राचार्य डॉ.नीरज व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.











