न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२४) :- दोघांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी रोख व ऑनलाईन स्वरुपात स्क्कम ४,७८,७०० रुपये स्विकारली. बनावट नियुक्तीपत्र देत ३४ वर्षीय तरुणाची फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार डिसेंबर २०२२ ते मार्च २०२४ पर्यत देहुरोड येथे घडला. गौरव हरीष भाटीया (वय ३४ वर्ष, डिफेन्स कॉन्ट्रक्टर खाजगी नोकरी) यांनी आरोपी १) प्रविण एकनाथ पांचाळ (वय २२ वर्षे), २) एकनाथ पांचाळ (वय अंदाजे ५० वर्षे रा. आदर्श नगर काळेवाडी) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
देहुरोड पोलिसांनी ४५६/२०२४ भां.द.वि. कलम ४२०,४६८,४७१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि कदम पुढील तपास करीत आहेत.