न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यासाठी निवडणूक विभागाने निवडणूक लढविलेल्या उमेदवारांची येत्या सोमवारी (दि.१३) रोजी बैठक आयोजित केली आहे. २३ मे रोजी होणा-या मतमोजणी प्रक्रियेची उमेदवारांना माहिती दिली जाणार आहे.
आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयातील सातव्या मजल्यावर सोमवारी सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. मावळच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे.
मतमोजणी प्रक्रियेची माहिती, मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी नेमणुकीची कार्यपद्धती, सुरक्षा व्यवस्था कशी असणार आहे. मतमोजणीदिवशी स्ट्राँग रुम’कधी उघडली जाणार आहे. मतमोजणीचे राऊंड कसे असणार आहेत. एका टेबलवर किती माणसे बसू शकतात. एकमेकांचे पासेस वापरल्यास कारवाई होऊ शकते याची माहिती आणि जाणीव या बैठकीत करुन दिली जाणार असल्याचे कविता द्विवेदी यांनी सांगितले











