न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- सध्या ऑनलाइन फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत. अशा वेळेस फसवणूक झालेल्यांना काय करायचे? गुन्हा कसा दाखल करायचा याबाबत माहिती नसते.
याबाबत पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी मार्गदर्शन केले आहे. ऑनलाइन फसवणूक झाल्यास सायबर विभागाकडे लेखी तक्रार करा. त्यासोबत मोबाईलवरील मेसेजची प्रिंट व शक्य असल्यास बॅंक स्टेटमेंट जोडा. त्यानुसार तपास सुरू होतो.
पैसे वर्ग झालेल्या खात्याची माहिती घेतली जाते. त्या खातेदाराची केवायसीबाबत माहिती घेतली जाते. एटीएममधून पैसे काढले असल्यास सीसीटीव्ही फुटेज बघितले जाते. ५० हजारांच्या आतील गुन्हे पोलिस ठाण्याकडे वर्ग केले जातात. त्यावरील रकमेच्या गुन्ह्याचा तपास सायबरचे अधिकारी करतात, असे मुगळीकर यांनी सांगितले.











