न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- सासरच्या मंडळीकडून महिलेकडे वेळोवेळी माहेरून पैसे आणण्याची मागणी केली असता, त्यास नकार दिला तर सासरच्यांनी महिलेस मारहाण केली.
महिला दोन महिन्यांची गरोदर असताना, पती सुरज याने तिच्या पोटावर मारहाण केली. तसेच महिलेचा पती आणि सासू यांनी वारंवार महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यात तिचा गर्भपात झाला.
चिंचवडमधील शाहूनगर परिसरात ही घटना घडली असून, महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज शिवाजी वाडघरे, सासरे शिवाजी वाडघरे, सासू पारू वाडघरे, नणंद स्मिता सचिन रेणुसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.











