न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- बीव्हीजी इंडिया कंपनीने विविध उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी शहरात एलईडी स्क्रीन लावल्या आहेत. २०१६ ते मार्च २०१९ या कालावधीत कंपनीच्या ३५ लाख २८ हजार रुपये किमतीच्या १६० एलईडी स्क्रीन काढून, त्याची कंपनीच्या परस्पर विक्री केली.
याप्रकरणी हर्षद राजकुमार पाटील (वय ३५, रा. प्राधिकरण) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पराग विश्वासराव मोरे, प्रशांत नारायण सद्रीक, शोयब बशीद सय्यद, राघव सदाशिव कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.











