- भव्य शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून विरोधकांना दाखवली ताकद..
- विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ वार्ताहर (दि. २४ ऑक्टोबर २०२४) :- मावळ मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार सुनील शेळके यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर झाल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. असे असतानाही आज आ. सुनील शेळके यांना पाठींबा देण्यासाठी मावळातील प्रचंड जनसमुदाय भर उन्हात आज रस्त्यावर आला. त्यामुळे सुनील शेळकेंनी भव्य शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून मतदारसंघातील आपली ताकद दाखवून दिल्याचे दिसत आहे.
सुनील शेळके यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, माजी सभापती गणेश आप्पा ढोरे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवी, ज्येष्ठ नेते दीपक हुलावळे, भरत येवले, सुनील ढोरे यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना आ. शेळके म्हणाले, ”मावळचे स्थानिक नेते करत असलेला विरोध हा वैचारिक नसून वैयक्तिक आहे. केवळ आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाले नाही, आपले धंदे बंद होत आहेत, म्हणून हा सर्व खटाटोप सुरू असल्याचे सुनील शेळके यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. सुनील शेळकेने पैसा कमावला नाही तर जिवाभावाची माणसं कमावली. आज आलेली ही मायबाप जनता मला आशीर्वाद देण्यासाठी आली आहे. माझी मायबाप जनता हीच माझी ताकद असल्याचे सुनील शेळके म्हणाले”.