न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- पोलिसांना वर्दी उतरवण्याची धमकी देत पोलीस चौकीतच धिंगाणा घालणाऱ्या २२ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास दापोडी पोलीस चौकीत घडली.
पोलीस हवालदार सुरेश मुंडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जयेश विनोद चव्हाण (वय २२), तेजस विनोद चव्हाण (वय १९, रा. औंध हॉस्पीटल क्वॉटर्स), अशोक पाचू चव्हाण (वय ५४), सुनिल अशोक चव्हाण (वय २८), शुभम अशोक चव्हाण (वय २३), ललिता अशोक चव्हाण (वय ४५, सर्व रा. संगमवाडी, खडकी) आणि किरण विशाल ननावरे (वय ३१, रा. मुळा रोड, खडकी) अशी अटक केलेल्या सात जणांची नावे आहेत. इतर १५ जण पसार आहेत.











