न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२४) :- शिवसेना (शिंदे गट) भोसरीच्या वतीने महायुतीचे उमेदवार आ. महेश लांडगे शिवसैनिकांचा “शिवसेना निर्धार मेळावा” नुकताच मोशी प्राधिकरण येथे भोसरी विधानसभा शहर प्रमुख संभाजीराव शिरसाट यांच्या पुढाकाराने संपन्न झाला.
या मेळाव्यात भोसरी विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेना, महिला आघाडी, युवा सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी महायुतीचे उमेदवार आ. महेश लांडगे यांना विजयी करण्याचा संकल्प केला.
या मेळाव्यास शिवसेना उपनेते इरफान सय्यद, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, महिला जिल्हाप्रमुख मनीषा परांडे, भोसरी शहर महिला संघटिका जानवी पवार, शहर संघटक संदीप जाधव, समन्वयक साईनाथ ढाकणे, युवा उपजिल्हाप्रमुख अरुण जोगदंड, युवा जिल्हा समन्वय सागर पाचरणे, विभाग प्रमुख तसेच शाखाप्रमुख व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.














