न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०१९) :- दिवसरात्र तैनात राहून नागरिकांची आणि विशेषतः महिलांचे रक्षण करणाऱ्या पोलिस दलाचे महिलांनी एकत्रित येवून सर्व पोलिसांचा सत्कार केला.
दिघी, विश्रांतवाडी आणि येरवडा पोलिस ठाण्यांत जाऊन त्यांना पुष्पगुच्छ व अल्पोपहार देण्यात आला. यावेळी दिघी येथील अॅड सोनाली घाडगे म्हणाल्या की, पोलिस डोळ्यात तेल घालून पहारा करतात. त्यामुळे आपण सुरक्षित आहोत.
महिला व मुलींच्या रक्षणासाठी ते तत्पर धावून येतात. त्यामुळे त्यांचा आपण सर्वांनीच सन्मान राखणे आवश्यक आहे. यावेळी कांचन जाधव, गणेश कांबळे, अजित गाडवे, वैशाली शिंगवी आदी उपस्थित होते.











