न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विषय समित्यांचा एक वर्षांचा कालावधी बुधवारी (दि. ८) रोजी संपल्याने त्या बरखास्त करण्यात आल्या आहेत.
नव्या सदस्यांची निवड सोमवारी (दि . २०) रोजी होणा-या पालिका सभेत होणार आहेत. पालिकेच्या विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचा एका वर्षांचा कालावधी संपला आहे.
समितीच्या नव्या सदस्यांची निवड पालिका सभेत केली जाणार आहे. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजपचे ५, राष्ट्रवादीचे ३ व शिवसेनेच्या एका नगरसेवकांस समितीवर संधी मिळणार आहे.











