- ‘तेव्हा कुठे होते विरोधक?’..
- ‘आमचे आमदार महेशदादाच आज सर्व विरोधकांना पुरून उरलेत’..
- ते आमदारकीची हॅट्रिक करणार, यात शंकाच नाही – भाजपा युवा नेते पांडाभाऊ साने…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ नोव्हेंबर २०२४) :- चिखलीकरांचा पाठीराखा आणि भाग्यविधाते आ. महेशदादा लांडगे यांच्यामुळे आज चिखली मोरेवस्तीसह भोसरी विधानसभेत विकासात्मक कायापालट झाला आहे. त्यांच व्हिजन २०-२० हे आज परिवर्तनवादी ठरलं आहे. सर्वसामान्य घटक दृष्टीसमोर ठेवून सतत जनतेसाठी चोवीस तास झटणारे आमचे लाडके आमदार महेशदादा यांच्या कार्यकर्तुत्वामुळे भोसरी मतदारसंघ आज खऱ्या अर्थाने स्मार्ट ठरत आहे. त्यांची हीच विकासाची दृष्टी चिखलीतील मोरेवस्ती भागाला विकासाच्या वाटेवर घेऊन जात आहे. त्यांची येथील नागरिकांवर असणारी विकासाची प्रेमळ दृष्टी खरोखरच अवर्णनीय म्हणावी लागेल. येथील नागरिकांच्या मानगुटीवर बसलेले शास्तीकराचे भूत तर त्यांनी चुटकीसरशी दूर केले. त्यामुळे हजारो बाधितांना यातून कायमची सुटका मिळाली, असं प्रतिपादन भाजपचे युवा नेते पांडाभाऊ साने यांनी केलं.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना-एनसीपी-आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांच्या आपुलकीच्या गाठीभेटींचे चिखली, मोरेवस्ती, पाटीलनगर परिसरात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक, महायुतीच्या सर्व घटकपक्षांचे प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ, सोसायटीधारक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान आमदार महेशदादा लांडगे यांचे साने चौकात जंगी स्वागत करण्यात आले. हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या गावभेटी दौऱ्यात पदयात्रा व बाईक रॅली काढण्यात आली होती. त्यास परिसरातील नागरिकांचा भव्यदिव्य प्रतिसाद मिळाला.
पुढे बोलताना पांडाभाऊ साने म्हणाले, ” कोरोना काळात आमदार महेशदादांचा ‘एक हात मदतीचा’ अनेक गरजू सर्वसामन्यांच्या मदतीला धावून आला. कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा त्यांनी उपलब्ध करून दिली. मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा झाला, तेव्हा मास्क व सॅनिटायझर मोफत घरपोहोच करणारे आमचे महेशदादाच होते. अन्नधान्याचे किट असो की, मूळ गावी जाण्यासाठी नागरिकांना केलेली मदत असो, तर कुणाला रुग्णालयात बेडपासून ते उपचारापर्यंतची मदत करणारे केवळ आ. महेशदादाच होते. त्यामुळेच आमचे आमदार महेशदादा सर्वच विरोधकांना आज पुरून उरले आहेत, असेही ते म्हणाले.
”आज जे विरोधक आहेत, त्यांनीच सर्वप्रथम शहरातील अनधिकृत घरांना शास्तीकर लावला. तो दामदुप्पट वसूल करताना या विरोधकांना जराही बाधित नागरिकांची कीव आली नाही. त्यांना नेहमीच भीती खाली ठेवले. प्रशासनाच्या आडून आडून बाधित नागरिकांना वेळोवेळी नोटिसा पाठविल्या. शास्तीकर न भरल्यास अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून त्यांचे बांधकाम पाडण्याची कारवाई केली जात होती. तेव्हा कुठ होते विरोधक. आमच्या महेशदादांना सर्वसामान्यांचे हे दुख पाहवले नाही.त्यांनी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात शास्तीकराचा मुद्दा मांडून त्यावर पाठपुरावा केला. तेव्हा कुठ भोसरी मतदार संघासह शहरातील अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय राज्यातील महायुती सरकारने हिवाळी अधिवेशनात घेतला. चिखली मोरेवस्तीत रात्रीच्या वेळी पोलीस गस्ती वाढल्या. त्यामुळे आमच्या महिला भगिनी आज सुरक्षित आहेत. चिखली आणि परिसरातील सुमारे ९० हजार नागरिकांना आज पाणीपुरवठा नियमित होतोय. यासह इतरही विकासकामे केवळ आ. महेशदादा यांच्या कार्यक्षमतेमुळेच झाली आहेत. त्यामुळे आ. महेशदादा हेच खरे भोसरी विधानसभेचे विकासपुरुष आहेत. त्यांना येत्या वीस तारखेला चिखली मोरेवस्तीसह परिसरातून मतदारांच मोठ समर्थन मिळणार आहे. तसा निर्धार आज चिखलीसह मोरेवस्तीतील मतदारांनी केला आहे. त्यामुळे मोठ्या मताधिक्क्याने ते पुन्हा भोसरी मतदारसंघाचे तिसऱ्यांदा आमदार होतील यात शंका नाही, असे पांडाभाऊ साने म्हणाले.

















