न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ नोव्हेंबर २०२४) :- भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) केमिस्ट / फार्मासिस्ट आघाडीच्या अध्यक्षपदी विवेक मल्हारी तापकीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या सहीने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. वाकड येथे झालेल्या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश करत शुभेच्छा देण्यात आल्या.
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बळकटीसाठी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आपण यशस्वीरित्या पार पाडाल व आपल्या संघटनात्मक कौशल्याचा उपयोग भारतीय जनता पक्षाचा विचार आणि धोरणे औषध विक्रेते व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास यशस्वी व्हाल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त करत पुढील पक्षीय कार्यास तापकीर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
विवेक तापकीर हे गेली अनेक वर्षांपासून केमिस्ट / फार्मासिस्टमध्ये काम करत असून त्यांचे मेडिकल लाईनमध्ये मोठे जाळे आहे. तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात देखील त्यांचे सक्रीय कार्य आहे. त्यामुळे या पदाला ते योग्य न्याय देतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

















