न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ नोव्हेंबर २०२४) :- महापालिकेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचार कामात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देश शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना दिले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आचारसंहिता नियमाचे पालन करण्याबाबतचे विविध प्रकारचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. तसेच, राज्यातील शाळा- महाविद्यालयातील शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सामाईक परिनियम अस्तित्वात येईपर्यंत महाराष्ट्र नागरीसेवा नियमातील तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणातभाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य होता येणार नाही. तसेच, त्यांच्याशी संबंध ठेवता येणार नाही किंवा कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कार्यात कोणत्याही प्रकारे भाग घेता येणार नाही. अथवा सहाय्य करता येणार नाही, त्याचप्रमाणे कोणत्याही कर्मचाऱ्यास विधानसभेच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुकीत प्रचार करू शकणार नाही, हस्तक्षेप करू शकणार नाहीत.
महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शैक्षणिक कर्मचाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य होता येणार नाही. तसेच, त्यांच्याशी संबंध ठेवता येणार नाही किंवा कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कार्यात कोणत्याही प्रकारे भाग घेता येणार नाही.
– संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, महापालिका…

















