न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दापोडी येथील शितळादेवी चौकात मोठी कारवाई केली. या भागात असलेल्या अनधिकृत पत्राशेड विरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक मोहीम राबवत ३२ पत्राशेड हटवले.
या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत रहिवासी आणि व्यावसायिक पत्राशेड होते. या कारवाईत महापालिकेचे आठ अधिकारी, दोन पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक, भोसरी पोलीस ठाण्याचे २८ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत अतिक्रमणांना चाप बसण्यासाठी पत्र्यांच्या शेडवर कारवाई केली. तसेच अतिक्रमण कारवाई काही दिवसात तीव्र करणार असल्याचेही अतिक्रमण विभागाने सांगितले आहे.











