न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२४) :- खान्देश युवा महासंघ पिंपरी चिंचवड शहर विभागाच्या वतीने आहेर गार्डन वाल्हेकरवाडी येथे दरवर्षीप्रमाणे खान्देश परिवार स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यास आमदार उमा खापरे, युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, शिवसेना शहर जिल्हा प्रमुख निलेश तरस, जिल्हा उपप्रमुख राजेश वाबळे, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, अतुल वरपे ,विजय मोहिते, कमलाकर गोसावी, मुख्य निमंत्रक माऊली जगताप, खान्देशी कलाकार व गायक भैय्या मोरे ,विनोद कुमावत, मेघा मुसळे, त्रिशा पवार, रमाकांत कापडणीस, रवि खरे, समीर, कावेरी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा पाटील निसर्ग मित्र मिथुन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
“‘जय खान्देश – जय कानबाई माता” च्या घोषणेने आमदार उमा खापरे यांनी भाषणाची सुरुवात केली. शहराच्या जडणघडणीमध्ये खान्देशी समाजाचा मोठा वाटा आहे. कामगार नगरी म्हणून लौकिक प्राप्त करणाऱ्या आपल्या पिंपरी चिंचवड शहराकरिता खान्देशी तरुणांचे मोठे योगदान आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले. मेळाव्यास खान्देशवाशीय विशेषतः महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे मेळाव्यास मार्गदर्शन केले.
मुख्य निमंत्रक माऊली जगताप म्हणाले,” खान्देश युवा महासंघ आपल्या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून खान्देश वासीयांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करीत आहे. उत्तर महाराष्ट्रातून पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात खान्देशी परिवार कामानिमित्त येऊन स्थायिक झालेला आहे. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचे निराकरण करण्याचे कार्य अनेक वर्षांपासून खान्देश युवा महासंघ करीत आहे. समाजात कार्यरत असणारे माझ्या बंधू भगिनींना खान्देश भूषण व खान्देश रत्न पुरस्कार देताना आनंद होत आहे. खान्देश वासीयांच्या एकत्रित प्रयत्नाने यापुढे कार्यक्रम आयोजित केले जातील”
युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे म्हणाले,” शहरात खान्देश युवा महासंघ हा समाजातील तळापर्यंत पोहचून खान्देशवाशीय परिवाराच्या समस्या जाणून घेत आहे.
खान्देश भूषण पुरस्कार हे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील, सी आय डी पुणे सहा.आयुक्त दीपक भदाण, महेंद्र पाटील, राजेंद्र बोरसे निगडी पोलीस ठाणे, मनोहर पाटील, उपआयुक्त निलेश भदाणे, महेंद्र पाटील, राजेंद्र कढरे, आरोग्यम हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल महाजन, डॉ सागर पाटील, आस्था हॉस्पिटलचे डॉ.देवीराज पाटील,उद्योजक नितीन पाटील यांना प्रदान करण्यात आला.
खान्देशरत्न पुरस्कार – भागवत झोपे, हेमंत झोपे,महेश बोरोले, रविंद्र कुवर, डॉ.निलेश पाटील, डॉ.गिरीश महाजन,डॉ.दिग्विजयसिंग जाधव, प्रवीण माळी, राहुल पाटील (महाराज),नंदू महाजन,मनोज सर ओंकार चौधरी, विजया जंगले, डॉ.रेखाताई भोळे, किरण पाचपांडे, विभावरी इंगळे, गौरी सरोदे, कविता पाटील, किरण चौधरी, मनोहर पगारे, योगेश चौधरी, देवेंद्र पाटील, धनराज पाटील, महेश पाटील, किरण देवरे, सचिन शिरोळे, वेदांत पाटील, राहुल पाटील, अरुण येवले, नितीन माळी, किशोर बोरसे, गोकुळ भामरे, पंकज खैरनार यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे निमंत्रक माऊली जगताप, रवींद्र कुवर, उमेश बोरसे, उमेश पाटील, एकनाथ पाटील, हिरालाल पाटील, प्रल्हाद पाटील, नितीन पाटील, गौतम बागुल हे होते. संयोजन व विशेष परिश्रम शरद सोनवणे, चंद्रकांत पाटील, दीपक पाटील, विठ्ठल सोनगीरस, प्रल्हाद पाटील, सौरभ पाटील, संदीप जगताप, सतीश सौंदाणे, समाधान पाटील, निलेश सुभाष पाटील, रोहन शेटे, अजय पाटील संदीप पाटील, अनिल नेरकर ,चंद्रकांत पाटील,चंद्रकांत सौंदाणे,राहुल मोरे,धिरज जाधव,चेतन पाटील,देवेंद्र सोनवणे नितिन पाटील,प्रशांत महाजन,विश्वास पाटील,चेतन सोनवणे,तुषार दहिते,वैभव माळी,रितेश चौधरी,राहुल पाटील,रोशन कोळी,संदिप वसाने,अक्षय चौधरी,हर्षल धनगर यज्ञेश,अर्जुन पाटील,रितेश पाटील, नरेंद्र पाटील,रतन पाटील,रामकृष्ण पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिलीप गायकवाड यांनी केले.

















