- तब्बल अकरा जणांच्या टोळीला पुनावळेच्या गायकवाडनगरमधून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२४) :- “रेड्डी आन्ना” या प्रतिबंधित केलेल्या बॅटीग वेब पोर्टलव्दारे अकरा जणांनी कट रचुन विनापरवाना ऑनलाईन जुगार खेळला. ऑनलाईन जुगारासाठी वापरण्यात आलेले बनावट बँक खाते, सिमकार्ड याच्या आधारे आरोपींनी खातेधारकांची ओळख वापरुन संगणक व मोबाईलव्दारे त्यांचा पासवर्ड घेवुन बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाते उघडून त्याव्दारे सामान्य लोकांची कट रचुन फसवणुक केली आहे.
पोलिसांनी एकुण ७,४८,१०० रुपये किमतीचे ऑनलाईन जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ही घटना जुलै २०२४ पासुन ते दि.१०/११/२०२४ पर्यत अॅडम व्हिले सोसायटी, फ्लॅट नंबर १००२, गायकवाड नगर, पुनावळे येथे घडला.
याप्रकरणी आरोपी १) पियुष शेषनारायण सोनी (वय १९ वर्षे मुळ रा. दुर्ग, छत्तीसगड), २) मुनेश्वर चुरानंद देवागन (वय १९ वर्षे, मुळ रा. दुर्ग, छत्तीसगड), ३) अजस अरुणकुमार सिन्हा (वय २४ वर्षे, मुळ रा. दुर्ग, छत्तीसगड), ४) हॅमतकुमार नारायण ठाकुर (वय २५ वर्षे, मुळ रा. दुर्ग, छत्तीसगड), ५) संजय माणिक परदेशी माणिक पुरी (वय १९ वर्षे, मुळ रा. दुर्ग, छत्तीसगड), ६) हितेश पुनाराम देवांग (वय २७ वर्षे मुळ रा. दुर्ग, छत्तीसगड), ७) सागर अशोक गजभिर (वय २७ वर्षे मुळ रा. दुर्ग, छत्तीसगड), ८) अनिकेत हॅमत यादव (वय १९ मुळ रा. सिध्दकेला, जि. बलागिर, राज्य ओडीसा), ०९) अक्षय अमीन अस्थाना (वय २७ वर्षे, मुळ रा. बस्तावली गांव, इंदीरानगर, लखनऊ, उत्तरप्रदेश), १०) फुलेंद्र अशोकराव कुमार (वय २७ वर्षे, मुळ रा. भापटीया, सुपौल राज्य-बिहार), ११) आकाश दास ऊर्फ जॅक (पुर्ण पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात रावेत पोलिसांनी ४८६/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३१८ (४),३३५, ३३६ (२), ३३६ (३) ३३८,३४० (२), ६१ (२) सह महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४,५ सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६ (सी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपी क्रमांक १ ते १० यांना पोलिसांनी अटक केली आहे. सपोनि देशमुख पुढील तपास करीत आहेत.
















