न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२४) :- तक्रारदाराचा मित्र आणि आरोपी क्रं १ यांच्यात झालेल्या किरकोळ भांडणावेळी सोबत असलल्याचा राग मनात धरुन आरोपी क्रं १ व विधीसंघर्शित बालक त्याचे इतर दोन मित्र यांनी आपसात संगणमत करीत तक्रारदार याला शिवीगाळ करुन हाताने व लाथाबुक्याने मारहान केली.
हातात लाकडी दांडके घेवुन तक्रारदाराच्या डोक्यावर मारुन त्यांना गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि.०७) रोजी रात्री ९.४५ वा. बेबी स्कुलचे शेजारी, तापकिर मळा, काळेवाडी येथे घडला.
याप्रकरणी साहिल शंकर नवरत्ने (वय १७ वर्षे, रा. तापकिरमळा, काळेवाडी) याने आरोपी १) साहिल (पुर्ण नाव माहित नाही वय अंदाजे २० वर्षे), २) विधीसंघर्शित बालक (रा. काळेवाडी), ३) साहिल याचे अनोळखी ०२ मित्र (नाव गाव माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. वाकड (काळेवाडी) पोलिसांनी आरोपींच्या विरोधात १२२९/२०२४ बी.एन.एस. कलम १०९ (१), ११५(२), ३५२,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















