न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२४) :- विधानसभा निवडणुकांमुळे मंगळवारी (दि. १९) आणि बुधवारी (दि. २०) असे दोन दिवस महापालिका शाळा तसेच ज्या शाळेत मतदान केंद्रे आहेत, अशा शाळांना सुट्या देण्याच्या सूचना प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकांचे मतदान बुधवारी (दि. २०) होत आहे. त्यासाठी शिक्षक आणि मतदान केंद्रासाठी शाळांच्या इमारतीही वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदानाच्या तयारीसाठी म्हणजेच आदल्या दिवशी मंगळवारी (दि. १९) खोल्या ताब्यात घेण्यात येणार आहेत.
तसेच मतदानाच्या दिवशी बुधवारी (दि. २०) मतदान होणार आहे. त्यामुळे दोन दिवस शाळांना सुट्टया देण्यात आल्या आहेत. गुरुवारी (दि. २१) पूर्ववत सुरू होतील, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.
निवडणुकांसाठी मतदान केंद्रे म्हणून शहरातील महापालिका तसेच खासगी शाळांच्या खोल्याही घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे खासगी शाळांनी सोमवारी अर्धा दिवस तसेच मंगळवार व बुधवार अशा सुट्ट्या दिल्या आहेत. तर काही शाळांनी ऑनलाईन वर्ग घेण्याची पर्यायी व्यवस्था केली आहे.
















